Ad

Wednesday 29 May 2019

निःशब्द

शब्द टाकून मागे
मी कधीचा पुढे आलो
तू थांबलीस शब्दांशी
मी कधीचा अबोल झालो..

तू बोलतेस माझ्याशी
मी वाचतो तुला ग..
शब्दांशी अडतेस तू..
निःशब्द मी होतो ग

मौनातच लपले माझ्या
गुज मम अंतरीचे...
एक हळवे हृदय गाते
गीत अबोल प्रीतीचे

अस्तित्व तुझे जपलेले
तेच सुखद आहे...
आहेसच तू भोवती
जरी देशांतरी तू आहे

मिळवावे काही तरी
आस कसली नाही...
उजळावी एक पणती
आस चांदण्याची नाही

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 25 May 2019

देव की दैव

देव की दैव...

आरंभ म्हणू की अंत म्हणू
आनंद म्हणू की खंत म्हणू
दिव्याखाली अंधार लपला
दांभिक म्हणू की संत म्हणू

सांज म्हणू की रात म्हणू
सृजन म्हणू की उत्पात म्हणू
उकल जयाची दुर्लभ भारी
दुनिया म्हणू की गुंतागुंत म्हणू

लाभले म्हणू की हरवले म्हणू
की लाभले तेच आपले म्हणू
आपले आपले परके झाले त्या
परके म्हणू की आपले म्हणू...

संकट म्हणू की संधी म्हणू
बरसात म्हणू की आंधी म्हणू
मायेच्या बेडीत बांधलेला
मी बंदी म्हणू की कैदी म्हणू

माझे म्हणू की हे त्याचे म्हणू
कष्टाचे म्हणू की फुकाचे म्हणू
अगम्य अतर्क्य हा सर्व पसारा
देवाचा म्हणू कि दैवाचा म्हणू

-प्रशांत शेलटकर
8600583846

कधी तुझी आठवण आल्यावर

कधी तुझी आठवण
आलीच तर...
श्वास गहिवरतो....
जीव उदास होतो...
अन डोळ्यांचा
समुद्र होतो...

कधी तुझी आठवण
आलीच तर....
मी गच्चीवर जातो
तुझ्या घराच्या कौलातून
आकाशात उंच जाणारा
धूर दिसत नाही आजकाल
तरीपण मला दिसत राहतेस तू
केसांच्या बटा सावरत,
भरलरले डोळे चोळत
फुंकर घालणारी तू
त्या विझू पाहणाऱ्या जाळावर

कधी तुझी आठवण
आलीच तर..
तिथेच जातो परत,
त्याच खुणेच्या झाडाखाली
साऱ्या खुणा तशाच आहेत
तेच झाड तोच बहर
तोच सांजेचा कातर प्रहर..
हताश होऊन बसतो तिथेच
जिथे तू बसायचीस बिलगून
मी परत अनुभवतो
तो मातीचा स्पर्श ,
जिथे तुझ्या पायाच्या अंगठयाने कोरला होतास
तिथल्या ओल्या मातीवर
तुझा सलज्ज होकार...
मी परत अनुभवतो,
तो मातीचा अलवार स्पर्श...

कधी तुझी आठवण
आलीच तर..
आठवतो तो क्षण
जेव्हा तू धरला होतास
माझा हात अवचितपणे...
सारा देह चांदण्याने
तेव्हा चिंब न्हालेला..
तुझ्या डोळ्यात मीच काय
माझा  आत्माही दिसलेला..

कधी तुझी आठवण
आलीच तर..
डोळे घेतो  गच्च मिटून
तरी तू दिसत रहातेस..
कुठेतरी आत भिनत जातेस
तू अशी आत भिनत गेलीस
की मी मिटून घेतो स्वतःला
तू माझ्यातच रहाविस म्हणून

कधी तुझी आठवण
आलीच तर..
मी असाच मिटून घेतो स्वतःला
कारण कुणाला कळू नये तुझं
माझ्यातल अस्तित्व...
एवढं तरी जपायला हवंच ना..

कधी तुझी आठवण
आलीच तर..
मी असंच करतो
मी असंच करतो.....

-प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday 22 May 2019

तू अस का करतेस?

तू असं का करतेस???

बोलायचंच नाही  म्हणतेस
अन डोळ्यातून बोलत रहातेस
हसायचंच नाही म्हणतेस
अन गालावर खळी पाडतेस

वाट पाहणार नाही म्हणतेस
आणि येरझारा घालत बसतेस
निघून जाईन म्हणतेस
अन मागे वळून पाहतेस...

संबंध संपला म्हणतेस
अन लास्ट सिन पहात बसतेस
कित्येकदा ब्लॉक  करतेस
आणि परत अनब्लॉक करतेस

रडणार नाही म्हणतेस...
अन उगाचच चेहरा फिरवतेस
फोन उचलणार नाही म्हणतेस
अन फोन चेक करत बसतेस

इतकं का हसत असतेस ?
की मनातलं लपवत असतेस ?
नकार नकार देत राहतेस पण
मनातून प्रेम करत असतेस

होय ना? 🙂

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday 18 May 2019

लोकशाही

निकालाच्या दिवशी,
कुणीतरी जिंकणार आहे
कुणीतरी हरणार आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

जिंकलेल्याने माजू नये
हरलेल्याने खचू नये...
हारजीत असायचीच
खेळ भावना अमर आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

रावाचा रंक होतो
अन रंकाचा राव..
आज हरला तरी
उद्या जिंकणार आहे.
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

मंत्री असो वा खासदार
आमदार असो वा नामदार
शेवटी सेवक जनतेचे...
खरा राजा मतदार आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

कोण डावा कोण उजवा
तेवढयाच पुरती असते हवा
असंख्य असले धर्मपंथ जरी
सविंधान हाच धर्म आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

जिंकेल त्याला शुभेच्छा द्या
हरलेल्याना नवी उमेद द्या..
मतभेद किती असले तरीही...
इथे प्रत्येक भारतीय आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..

प्रशांत शेलटकर
8600583846

मेहंदी

मेहंदी रंगावी ना..
तशी तू रंगत जातेस
फरक इतकाच की
मेहंदी हातावर अन तू...

जाऊदे सर्वच नसतं सांगायचं
थोडं असतं राखायचं...
जी आवडते ना..
तिलाच खोलवर जपायचं..

इतकं खोलवर की कधी,
स्वतःलाच समजून येऊ नये..
कधी काळी पुस्तकात जपलेलं
एखाद पिंपळपान...

मग एखाद्या ओल्या क्षणी
अलगद उघडावे पुस्तक
आणि अवचित समोर यावं
जपलेलं पिंपळपान...

तू तशी अवचितच येतेस
कधी समक्ष कधी असमक्ष
ती तशी आलीस की,
फुलून येतो गुलमोहोर...
अन चाफाही गंधाळतो...

तुला कळतोय ना तो
फुललेला गुलमोहर...
अन धुंद करतोय ना तुलाही
तो मत्त गंधाळलेला चाफा...

बस्स इतकंच,
आणखी काय हवं अजून
प्रत्येकवेळी यायलाच हवं का
शब्दांनी सजून ?

मौन बोलके होते तेव्हा,
शब्द मौनात जातात..
आणि ते मौनात गेले तरच
सुरवंटांची फुलपाखरे होतात..

तुला हे कळतंय ना ,
मनात मी झिरपतोय ना..
कुठेतरी तुझ्या मनातही
एक मोगरा फुलतोय ना...

असला तर असू दे
नसला तर नसु दे
पण तुझ्यासाठी काळजात
एक दिवा लावू दे..

कारण....

मेहंदी रंगावी ना..
तशी तू रंगत जातेस
फरक इतकाच की
मेहंदी हातावर अन तू...
काळजात.....

-प्रशांत शेलटकर
8600583846

फार गंभीर जगू नकोस

फार गंभीर जगू नकोस..
मित्रा ,आयुष्य फार थोडं आहे
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

सूर्य चंद्र रोजच उगवतील
ऋतू नेहमीच कुस बदलतील
दिवस असेल तसाच प्रखर
रात्र असेल तशीच कातर..
जगरहाटी असेल तशीच
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

कपाळावर आठी ठेवून
तू असा जगू नकोस..
नावं ठेऊन जगाला..
उगाच रडत बसू नकोस
जगून बघ स्वतः साठी
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

शाश्वत तर एकच आहे
इथे सगळे बदलत आहे..
जे बदलत नाही कधी
ते कधीच मेलं आहे..
बदलून घे स्वतःला...
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

माझं माझं किती करशील
कोण तुझं आहे..?
श्वासही होतो परका,
माणसांची काय पर्वा आहे..?
माझं माझं सोड आता,
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

फार गंभीर जगू नकोस..
मित्रा ,आयुष्य फार थोडं आहे
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?

-प्रशांत शेलटकर
8600583846

देवा हे तुझेच सारे

देवा हे तुझेच सारे..

देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
जे दिले तुझे तुला ते
माझे माझे म्हणू कसे

डोळे जरी माझे तरी
दृष्टी तूच दिलीस रे..
रसना जरी माझी तरी
तुष्टी तूच दिलीस रे...
दृष्टी- तुष्टी तुझीच देवा
माझे माझे काही नसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे

कान जरी माझे तरी
श्रवण तूच दिलेच रे...
हात जरी माझे तरी
कर्म प्रेरणा तुझीच रे
संचित सारे तुझेच देवा
किंचितही माझे काही नसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे

देह जरी माझा तरी,
प्राणज्योती तुझीच रे
शरीर नश्वर माझे तरी
शाश्वत अंतिम तूच रे...
नित्य नूतन तू सनातन
तरी हा जीव कशात फसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे

देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
जे दिले तुझे तुला ते
माझे माझे म्हणू कसे

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday 11 May 2019

ओझे

ओझे

खूपच जड वाटलं म्हणून
डोईवरचे ओझे खाली उतरले
विस्कटून पाहिलं तर,....
अपेक्षांचे जुनाट गठठे,
इथे तिथे पडलेले...

अपेक्षा माझ्या इतरांकडून
अपेक्षा इतरांच्या माझ्याकडून
आणि हो एका बाजूला
जबाबदारीचाही एक गठ्ठा..
कोंबून बसवलेला...
जबाबदारी कुटुंबाची...
जबाबदारी माझी,तिची, त्यांची
इतकंच काय जगाचीही...

पण शोधूनही  सापडले नाहीत
तरल स्वप्नांचे गुलाबी गठ्ठे ...
तारुण्यात जमा केलेले..
आयुष्य चालताना बहुतेक माझ्याच नकळत
सांडून गेले असतील कदाचित

आता चालता चालताच
ओझे कमी करत चाललोय
सगळेच अनावश्यक गठ्ठे
फेकत फेकत चाललोय...
जसे जसे फेकतोय तसं
डोईवरचे अनावर ओझे,
हलकं होतंय..
अधिकच हलकं होतंय....
अधिकच हलकं होतंय....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Thursday 9 May 2019

रात्र कातर कातर...

रात्र कातर कातर...
सख्या मी हळवी हळवी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

जरी आतुर मी...
तू धीराने घे रे राजसा..
तुझ्या मिठीत बेभान मी
झाले रे राजसा....
आता नको जाऊ दूर तू
ये रे जवळी जवळी...
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

आता हवी कशाला?
ही उगाच रे बंधने....
त्यजुनी टाक रे ही
व्यर्थ सारी वसने...
देहात भिनली रे
ही धुंदी निराळी निराळी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

आज तुझे नि माझे
मिलन असे व्हावे...
हिरवे चुडे माझे..
अखंड कीणकीणावे...
अशी अखंड रहावी
ही रात्र सावळी सावळी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

तुझ्या मिठीत मला
धुंद धुंद होऊ दे...
तुझ्या प्रेमात मला
चिंब चिंब भिजूदे...
तू कृष्ण माझा .
मी राधा बावरी बावरी..
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

रात्र कातर कातर...
सख्या मी हळवी हळवी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..

प्रशांत शेलटकर
- 8600583846

इदम न मम्

हे परमेशा..
एखाद्या प्रशांत क्षणी जागे होते तुझ्या-माझ्यातले जुनेच नाते..
मग वाटतं,
मोहाची वस्त्रे उतरवून ठेवावीत
अपेक्षांच्या काठावर...
आणि झोकून दयावे स्वतःला
तुझ्या करुणेच्या गंगौघात...

मग जन्मानुजन्मे लिपटलेली
वासनांची पुटे निघून जावीत
तुझ्या कैवल्य गंगेत...अन
स्फटिकागत झळाळून उठावी
तुझी माझी आदिम ओळख...
तत्वमसी ..तत्वमसी. तत्वमसी
तो तूच आहेस
तो तूच आहेस
तो तूच आहेस..

अन तुझंच तुला अर्ध्य देताना
अन स्वतःचाच विलय होताना
एकच अनाहत नाद गुंजावा..
इदम न मम्...
इदम न मम्...
इदम न मम्...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Wednesday 8 May 2019

रिक्त हस्त

बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

खुशाल चालावे वाळूवर
त्याला पैसे पडत नाहीत
सोबतीला असो नसो कुणी
माझ कधी अडत नाही
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

कधी पावसात चिंब भिजावे
कधी  अंगावर उन घ्यावे...
सारे कसे मोफत आहे...
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

कधी काळोखाला सवाल करावे
अन चांदण्याचे जबाब  घ्यावे..
सवाल जबाब हे दैवी आहे..
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

नकोच नोटा नकोत  नाणी
नाती झाली केविलवाणी
निसर्गाशीच माझे नाते आहे
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

--प्रशांत शेलटकर

क्या यही प्यार है

तुला बरं नसलं
की मी  उदास होतो....
कुठेतरी शुन्यात मग
नजर लावून बसतो...
.
.
क्या यही प्यार है...😍

तुला कुठे लागलं तर
कळ माझ्या उरात येते
तूझ्या आधी माझ्याच
डोळ्यात पाणी दाटून येत...
.
.
क्या यही प्यार है...😍

आरशात कधी पाहिलं तर
मी कधी दिसतच नाही
तुझ्या शिवाय डोळ्यांना
काही सुंदर दिसत नाही
.
.
क्या यही प्यार है...😍

कधी कधी पडतात प्रश्न
हे काय असावे बरं...
तुझ्या माझ्या नात्याला
नाव काय द्यावं बरं...
.
.
क्या यही प्यार है...😍

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

तीच असते प्रीत खरी

जखम हवी हवीशी
वाटते कधी बरी....
जी व्यक्त होत नाही कधी
तीच असते प्रीत खरी

मनात जी असते ....
ती मनातच असावी बरी
दुःखात असलो जरी
सुखी असावी आपली परी

ती काय म्हणेल याची
चिंता नसावी उरी...
अपेक्षांच्या पल्याड वसते
खऱ्या प्रेमाची नगरी...

न कधी विस्मृतीत जाई
जीव जडे जीच्यावरी...
एक गोड दुखणे जडे
मग पूर्ण आयुष्यभरी....

कधी कधी न कळे
काय चालले तिच्या अंतरी
मग आपणही मौनात जावे
तिलाच ठेवूनी हृदयांतरी...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 4 May 2019

पर्याय

तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...

जर तू दिसलीस तर,
अश्रू माझे बंड करतील..
माझ्याही नकळत...
डोळ्यातून वाहू लागतील..
म्हणूनच....
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...

मी रडलो काय हसलो काय
तुला त्याची फिकीर नसेल...
कदाचित तुझ्या तळ हातावर
माझ्या नावाची लकीरच नसेल
म्हणूनच,
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...

खोटी वचने खोटा दिलासा
खोटा तुझा जिव्हाळा....
खोट्या मिठीत गुदमरला..
खोटाच तुझा उमाळा..
म्हणूनच..
तू जितकी नजरेआड,
तितकं मला बरं आहे...
तुला विसरण्याचा ,
हाच एक पर्याय आहे...

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

Friday 3 May 2019

प्रेमच नाही

बेफाम आवडतेस तू मला
इतकी आवडतेस मला की
पण मी बजावतो माझं मला
की माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

तुझ्यासोबत बोलावसं वाटतं
कधी मौनात जावसं वाटत
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

कधी मनसोक्त हसावंस वाटत
पोटभर रडावंस पण वाटत..
पण मी बजावतो माझं मला
की माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

भरून येतात कधी डोळे..
कधी कंठ येतो दाटून...
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

कधी अनाम अनावर हुंदका
जातो असाच माघारी परतून
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

तू जशी बोलत जातेस
तशी मनात रुजत जातेस
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

जरी तुला जपलं आहे..
मनाच्या खोल कप्प्यात
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर  प्रेमच नाही

प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Thursday 2 May 2019

ती

"ती"

खरं सांगू मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

एखादीच सुंदर ''असते"
बाकी फक्त सुंदर "दिसतात"
पार्लरच्या जादूने...
पोर बिचारी नक्की फसतात...
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

लाल चुटुक ओठ अन
नैन शराबी शराबी...
फेशियल च्या किमयेन
गाल गुलाबी गुलाबी
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

चकाकणारे सगळंच
सोनं नसतं कधी..
उन्हात चमकली तरी
'गार" हिरा नसते कधी
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

चेहऱ्यावरचा रंग उद्या
नक्कीच उडून जाणार आहे
चेहऱ्यावर एक छानसं
स्मित मात्र उरणार आहे
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

प्रेम तिच्यावरच कर
जी तुझ्यावर करते
आणि मेकअप शिवाय
जी तुला "ऐश्वर्या" वाटते
म्हणून सांगतो मित्रा,
तू माझं ऐक...
एखादीच असते सुंदर,
बाकी सगळ्या "फेक"...

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...