आभास...
आता फ्रेंडलिस्ट माझी
शॉर्ट करायची म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय....
आभासी जग,
आभासी मैत्री
गरजेला कुणी येईल
याची नाही खात्री
मोजकेच सोबती,
जवळ ठेवायचे म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय....
फक्त शुभेच्छा देणारे
आता नकोयत मला...
आणि इमोजींची नक्षी
आता नकोय मला...
बोलणाऱ्या मित्रांशी
फक्त बोलायच म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय...
कोरड्या शुभेच्छा
कोरडी श्रद्धांजली
फक्त RIP पोस्टून
माणसं मोकळी झाली
मिठी मारून कुणाला
आता रडायचं म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय...
त्यांच्या त्यांच्या झुंडी
त्यांचे त्यांचे कळप
त्यांचे त्यांचे झेंडे
त्यांचे त्यांचे फलक
बिन शिक्क्याचं आता
जगायचं म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय.....
आभासी जग हे
गुदमरतो इर्थे श्वास
आभासी जगात या
फक्त जगण्याचेच भास
खऱ्याखुऱ्या जगात आता
परतायचं म्हणतोय...
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय...
आता फ्रेंडलिस्ट,
शॉर्ट करायची म्हणतोय
संगतीत फक्त "आपल्यांच्या"
आता रहायचं म्हणतोय....
✍️ प्रशांत शशिकांत शेलटकर
गोळप,रत्नागिरी.
8600583846
30/05/2021
No comments:
Post a Comment