" आपण आपल्या चॉईस प्रमाणे मुलाला जन्म देत नसून मुल आईवडील म्हणून आपल्याला निवडते..जन्म कुठे आणि कोणत्या कुटुंबात घ्यायचा हा पुनर्जन्मास इच्छुक असलेल्या आत्म्याचा चॉईस असतो. ( अधिक माहितीसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचे लिटरेचर अभ्यासून पहा) कदाचित काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत. त्याना तो असहमतीचा अधिकार आहेच..ज्याने त्याने स्वतःचा अभ्यास चालू ठेवायचा आहे.
मुलं आणि आपण एकच नाही हे ध्यानात घ्यायला हवं विशेष करून आयांनी..प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी असते आणि भूमिकाही..त्यामुळे कोणाच्याही बाबतीत फार पझेसिव्ह राहू नये.
माणसाचा जन्म झाल्याबरोबर नात्यांचे जुगाड चालू होते.एकेक नाते निर्माण होते तसे त्या नात्याचे मोह निर्माण होतात.कारण त्या नात्यापासून लाभ होत असतात. प्रेमात पडल्यावर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारी कपल्स काय त्या पूर्वी जगत नव्हती? ज्या दिवशी पहिला श्वास घेतला तेव्हा पासून माणूस जगतच आलाय.
त्यामुळे मी यांच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय जगू शकत नाही हे सत्य नाही. लोभ माणसांचा नसतो त्या माणसापासून मिळणाऱ्या लाभांचा असतो. तो लाभ थांबेल म्हणून माणसांच्या वियोगाचे दुःख जास्त असते.
लैंगिक सुख ते वात्सल्य व्हाया मानसिक आणि शारीरिक सुरक्षा या सर्व सुखाच्या भावना आहेत. त्या माणसामुळे पूर्ण होतात म्हणून माणसाला माणसांचा मोह असतो.
आमेन
आजचा ज्ञान डोस संपला
😃😃😃😃😃😃
- प्रशांत
No comments:
Post a Comment