Ad

Wednesday, 8 May 2019

रिक्त हस्त

बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

खुशाल चालावे वाळूवर
त्याला पैसे पडत नाहीत
सोबतीला असो नसो कुणी
माझ कधी अडत नाही
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

कधी पावसात चिंब भिजावे
कधी  अंगावर उन घ्यावे...
सारे कसे मोफत आहे...
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

कधी काळोखाला सवाल करावे
अन चांदण्याचे जबाब  घ्यावे..
सवाल जबाब हे दैवी आहे..
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

नकोच नोटा नकोत  नाणी
नाती झाली केविलवाणी
निसर्गाशीच माझे नाते आहे
म्हणून म्हणतो ...
बरे झाले देवा ...
मी रिक्तहस्त आहे
देणे-घेणे नकोच मला
मी मस्त मस्त आहे...

--प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

देव भोळा

देवभोळा..😃 देवाला जो मानत नाही  तो असतो नास्तिक.. माझी गोष्ट जरा वेगळीच  वेगळी नशा वेगळी किक  मी मानतो देवाला  पण देव मला मानत नाही कधी गेल...