फार गंभीर जगू नकोस..
मित्रा ,आयुष्य फार थोडं आहे
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
सूर्य चंद्र रोजच उगवतील
ऋतू नेहमीच कुस बदलतील
दिवस असेल तसाच प्रखर
रात्र असेल तशीच कातर..
जगरहाटी असेल तशीच
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
कपाळावर आठी ठेवून
तू असा जगू नकोस..
नावं ठेऊन जगाला..
उगाच रडत बसू नकोस
जगून बघ स्वतः साठी
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
शाश्वत तर एकच आहे
इथे सगळे बदलत आहे..
जे बदलत नाही कधी
ते कधीच मेलं आहे..
बदलून घे स्वतःला...
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
माझं माझं किती करशील
कोण तुझं आहे..?
श्वासही होतो परका,
माणसांची काय पर्वा आहे..?
माझं माझं सोड आता,
कुणाला कुणाच पडलं आहे?
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
फार गंभीर जगू नकोस..
मित्रा ,आयुष्य फार थोडं आहे
तुझ्याशिवाय मित्रा थोडंच,
जगाचं काही अडलं आहे..?
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment