Ad

Wednesday, 18 October 2023

समाप्त..

सगळे आनंद संपले आहेत..
जवळचे लांब गेलेले आहेत
कधी काळी जवळ असलेले
आज अनोळखी झाले आहेत

एखाद्याला जीव लावला की
असच होणार असतं
एक ना एक दिवस मनातून
ते उतरणार असत

म्हणून कोणावर कधी
प्रेम करू नये
स्वतःपेक्षा दुसऱ्याला
जीव कधी लावू नये

एक निमित्त हवं असत
नाती सारी तोडण्यासाठी
एक फुंकर पुरेशी असते
पणती तेवती विझवण्यासाठी

जे केलंस आजवर
त्या बद्दल खरंच आभार
आता तूला होणार नाही
माझ्या आठवणींचा भार

पाहिल्यांदाच मी हरलो आहे
कोणाला समजवताना
रडतोच माणूस ग
अपराध काही नसताना

डोळे भरून येतात
तुला अलविदा म्हणताना
काळजाचे होते पाणी
तुझ्याशी जुदा होताना

आता कोणाच्या मनात जागा
परत कधी करायची नाही
आणि अपमान होऊन 
परत मनातून उतरायचं नाही

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...