ओझे
खूपच जड वाटलं म्हणून
डोईवरचे ओझे खाली उतरले
विस्कटून पाहिलं तर,....
अपेक्षांचे जुनाट गठठे,
इथे तिथे पडलेले...
अपेक्षा माझ्या इतरांकडून
अपेक्षा इतरांच्या माझ्याकडून
आणि हो एका बाजूला
जबाबदारीचाही एक गठ्ठा..
कोंबून बसवलेला...
जबाबदारी कुटुंबाची...
जबाबदारी माझी,तिची, त्यांची
इतकंच काय जगाचीही...
पण शोधूनही सापडले नाहीत
तरल स्वप्नांचे गुलाबी गठ्ठे ...
तारुण्यात जमा केलेले..
आयुष्य चालताना बहुतेक माझ्याच नकळत
सांडून गेले असतील कदाचित
आता चालता चालताच
ओझे कमी करत चाललोय
सगळेच अनावश्यक गठ्ठे
फेकत फेकत चाललोय...
जसे जसे फेकतोय तसं
डोईवरचे अनावर ओझे,
हलकं होतंय..
अधिकच हलकं होतंय....
अधिकच हलकं होतंय....
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment