रात्र कातर कातर...
सख्या मी हळवी हळवी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
जरी आतुर मी...
तू धीराने घे रे राजसा..
तुझ्या मिठीत बेभान मी
झाले रे राजसा....
आता नको जाऊ दूर तू
ये रे जवळी जवळी...
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
आता हवी कशाला?
ही उगाच रे बंधने....
त्यजुनी टाक रे ही
व्यर्थ सारी वसने...
देहात भिनली रे
ही धुंदी निराळी निराळी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
आज तुझे नि माझे
मिलन असे व्हावे...
हिरवे चुडे माझे..
अखंड कीणकीणावे...
अशी अखंड रहावी
ही रात्र सावळी सावळी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
तुझ्या मिठीत मला
धुंद धुंद होऊ दे...
तुझ्या प्रेमात मला
चिंब चिंब भिजूदे...
तू कृष्ण माझा .
मी राधा बावरी बावरी..
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
रात्र कातर कातर...
सख्या मी हळवी हळवी
अजून ओली राजसा...
हळद पिवळी पिवळी..
प्रशांत शेलटकर
- 8600583846
No comments:
Post a Comment