निकालाच्या दिवशी,
कुणीतरी जिंकणार आहे
कुणीतरी हरणार आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
जिंकलेल्याने माजू नये
हरलेल्याने खचू नये...
हारजीत असायचीच
खेळ भावना अमर आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
रावाचा रंक होतो
अन रंकाचा राव..
आज हरला तरी
उद्या जिंकणार आहे.
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
मंत्री असो वा खासदार
आमदार असो वा नामदार
शेवटी सेवक जनतेचे...
खरा राजा मतदार आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
कोण डावा कोण उजवा
तेवढयाच पुरती असते हवा
असंख्य असले धर्मपंथ जरी
सविंधान हाच धर्म आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
जिंकेल त्याला शुभेच्छा द्या
हरलेल्याना नवी उमेद द्या..
मतभेद किती असले तरीही...
इथे प्रत्येक भारतीय आहे
युद्ध नव्हे हा उत्सव आहे
एक मात्र खरं की
लोकशाही जिंकणार आहे..
प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment