देव की दैव...
आरंभ म्हणू की अंत म्हणू
आनंद म्हणू की खंत म्हणू
दिव्याखाली अंधार लपला
दांभिक म्हणू की संत म्हणू
सांज म्हणू की रात म्हणू
सृजन म्हणू की उत्पात म्हणू
उकल जयाची दुर्लभ भारी
दुनिया म्हणू की गुंतागुंत म्हणू
लाभले म्हणू की हरवले म्हणू
की लाभले तेच आपले म्हणू
आपले आपले परके झाले त्या
परके म्हणू की आपले म्हणू...
संकट म्हणू की संधी म्हणू
बरसात म्हणू की आंधी म्हणू
मायेच्या बेडीत बांधलेला
मी बंदी म्हणू की कैदी म्हणू
माझे म्हणू की हे त्याचे म्हणू
कष्टाचे म्हणू की फुकाचे म्हणू
अगम्य अतर्क्य हा सर्व पसारा
देवाचा म्हणू कि दैवाचा म्हणू
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment