Ad

Monday 27 April 2020

लव्ह यू जिंदगी

इथे येणार नाही कुणी मास्तर
पाठीवर हात ठेवायला
आणि फक्त तू लढ
अस सांगायला....
तुझं तुलाच लढावं लागेल
निदान प्रतिकारासाठी...

इथे कुणी घालणार नाही
पायघड्या फुलांच्या तुझ्यासाठी
तुझं तुला चालावच लागेल
काट्यातून आणि काचातुनही 
निदान तुझं तुझ्यासाठी....

इथे कोण बोलणार नाही
कौतुकाचे चार शब्द तुझ्यासाठी
उपहास झेलावेच लागतील..
अपमान आणि निंदाही...
निदान वास्तव समजण्यासाठी

इथे कुणीही बोलणार नाही
प्रेमाचे चार शब्द तुझ्यासाठी
लव्ह यू म्हणावं लागेल स्वतः लाच
कधी कघी  स्वतः साठी...
निदान  प्रेम अनुभवण्यासाठी

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Tuesday 14 April 2020

जसा आहे...

जसा आहे जिथे आहे
तिथे मी मस्त आहे..
तुकडे तुकडे जोडीत
आयुष्य माझे शिवतो आहे

सुख आलं,जर कधी
अरे वाह म्हणतो आहे
रडू आलं जर कधी
मस्त मोकळा रडतो आहे

कधी कविता जमते मस्त
कधी शब्दांशी अडतो आहे
अडलो जरी कधी शब्दांशी
मनाशी मस्त बोलतो आहे.

सिध्द करायचे नाहीच काही
साध्य करायचे थोडेच आहे?
ओंजळ भरभरून प्राजक्त
आता फक्त वाटतो आहे..





Thursday 9 April 2020

कोरोना

थुंकू नका शिंकू नका
मास्क शिवाय फिरू नका
कोरोनाला हरवल्याशिवाय
मैदान आपले सोडू नका...

साबण लावून हात धुवा
मास्क लावून बाहेर जावा
एवढं नेहमी लक्षात ठेवा
प्रतिबंध हीच आहे दवा

हस्तांदोलन नकोच बाबा
मिठी मारणे नकोच बाबा
दोन हात जोडून बाबा
गड्या आपला नमस्कार बरा

उगाच कुठे फिरू नका
उगाच घर सोडू नका
पोलिसांना सहकार्य करा
वाद त्यांच्याशी करू नका

घरात रहा मस्त रहा
गाणी ऐका पिक्चर पहा
मस्तपैकी सर्वांसमावेत
भुरकत भुरकत प्या चहा

फेक पोस्ट करू नका
धार्मिक तेढ वाढवू नका
शासन असो कोणतेही
व्यर्थ टीका करू नका

जायेगा भाई जरूर कोरोना
जंग करो भाई इससे डरोना..
जो डर गया ओ मर गया
गब्बर ने तो ठीक कहाना ?

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Wednesday 8 April 2020

भैरवी

निसटून गेले...

वय भारून जाण्याचे
असे निघून चालले
की जसे फुलांना त्यांचे
सुगंध असे सोडून चालले

क्षण ते अधिरतेचे
असे निसटून गेले
त्यांना तसेच रोखण्याचे
भान निसटून गेले...

सोडुन गेले जुने मैत्र ते
नव्याने जोडणे राहून गेले
गाणे जुने विसरलो अन
नव्याने सूचणे विसरून गेले

आता साद देती
सूर आर्त भैरवीचे
सूर सुखद नांदीचे
आता पार विसरून गेलो..

किती जगावे पुन्हा नव्याने
आकडे वाढते फसवून गेले
उद्याची वाट पाहता पाहता
आज जगणे विसरून गेले

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 6 April 2020

मोदी

आम्ही लावले दिवे
मित्रा तुझी का जळते
न बोलता मित्रा तुझ्या
मनातील सारे कळते...

मनात तुझ्या मित्रा रे
मोदिंबद्दल किती द्वेष
दुसऱ्यांना भक्त म्हणून
काढतोस किती त्वेष

शेठ काय फेकू काय
जबान तुझी घसरते
मत्सराने गड्या तुझी
किती आग आग होते

नसतात रे सगळेच मित्रा
राजकारणी परफेक्ट
यापूर्वीचे राजकारणी का
होते सगळे करेक्ट?

त्यांच्याबद्दल मित्रा तुझे
तोंड उघडत नाही..
मोदी द्वेषा शिवाय तुझे
पान हलत नाही..

समजून घे रे संस्कृती
समजून घे परंपरा
तत्वासाठी सुद्धा रे इतका
द्वेष नाही बरा...

खूप घडत चांगलं मित्रा
आपल्या रे सभोवती
पाहण्याची फक्त वेड्या
पाहिजे रे दृष्टी

भक्त म्हणून वेड्या कधी
करू नको कुचाळकी
प्रत्येकाला मत असत याची
जाणीव ठेव पक्की..

डोळे उघडून बघ जरा
किती आहेत गुलाम
तिथे मात्र मूग गिळून
करतोस त्यांना सलाम

आता तरी सुधार मित्रा
तळमळ तुझी कळते
पण द्वेषापायी वेड्या तुझी
बुद्धी मात्र चळते.....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...