देवा हे तुझेच सारे..
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
जे दिले तुझे तुला ते
माझे माझे म्हणू कसे
डोळे जरी माझे तरी
दृष्टी तूच दिलीस रे..
रसना जरी माझी तरी
तुष्टी तूच दिलीस रे...
दृष्टी- तुष्टी तुझीच देवा
माझे माझे काही नसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
कान जरी माझे तरी
श्रवण तूच दिलेच रे...
हात जरी माझे तरी
कर्म प्रेरणा तुझीच रे
संचित सारे तुझेच देवा
किंचितही माझे काही नसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
देह जरी माझा तरी,
प्राणज्योती तुझीच रे
शरीर नश्वर माझे तरी
शाश्वत अंतिम तूच रे...
नित्य नूतन तू सनातन
तरी हा जीव कशात फसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
देवा,हे तुझेच सारे
माझे माझे म्हणू कसे
जे दिले तुझे तुला ते
माझे माझे म्हणू कसे
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment