जखम हवी हवीशी
वाटते कधी बरी....
जी व्यक्त होत नाही कधी
तीच असते प्रीत खरी
मनात जी असते ....
ती मनातच असावी बरी
दुःखात असलो जरी
सुखी असावी आपली परी
ती काय म्हणेल याची
चिंता नसावी उरी...
अपेक्षांच्या पल्याड वसते
खऱ्या प्रेमाची नगरी...
न कधी विस्मृतीत जाई
जीव जडे जीच्यावरी...
एक गोड दुखणे जडे
मग पूर्ण आयुष्यभरी....
कधी कधी न कळे
काय चालले तिच्या अंतरी
मग आपणही मौनात जावे
तिलाच ठेवूनी हृदयांतरी...
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment