बेफाम आवडतेस तू मला
इतकी आवडतेस मला की
पण मी बजावतो माझं मला
की माझं तुझ्यावर प्रेमच नाही
तुझ्यासोबत बोलावसं वाटतं
कधी मौनात जावसं वाटत
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
कधी मनसोक्त हसावंस वाटत
पोटभर रडावंस पण वाटत..
पण मी बजावतो माझं मला
की माझं तुझ्यावर प्रेमच नाही
भरून येतात कधी डोळे..
कधी कंठ येतो दाटून...
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
कधी अनाम अनावर हुंदका
जातो असाच माघारी परतून
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
तू जशी बोलत जातेस
तशी मनात रुजत जातेस
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
जरी तुला जपलं आहे..
मनाच्या खोल कप्प्यात
पण मी बजावतो माझं मला
माझं तुझ्यावर प्रेमच नाही
प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment