माणूस
पाप नको अन पुण्य नको
नैतिकतेचे हिशेब नको....
माणुसकीचे नाते हवे पण
देवपणाचे ओझे नको...
उपास नको अन जप नको
पोथ्यापुराणांचा त्रास नको
घास मिळो पोटापूरता...
सहस्त्र भोजनाचा थाट नको..
अस्तिकतेचे ढोंग नको
अन भक्तीचे सोंग नको
देव असुद्या घरापूरता..
रस्त्यावरती बोंब नको...
जात नको की पंथ नको
अन धर्माचा माज नको
माणूस राखावा माणसातला
मनी सैतानाला जागा नको...
दर्प नको की गर्व नको
मद नको की मत्सर नको
प्रेम करावे प्रेमाचसाठी
प्रेमाला कसले बंध नको...
-प्रशांत शेलटकर