खरंच काय असतं प्रेम
दोघांचा एक श्वास असत प्रेम
दोघांचा एक ध्यास असतं प्रेम
खरंच काय असतं प्रेम
अंतरातला नाद असतं प्रेम
सादाला प्रतिसाद असतं प्रेम
खरंच काय असतं प्रेम
देवकीचा अतृप्त पान्हा असतं प्रेम
यशोदेचा नटखट कान्हा असतं प्रेम
खरंच काय असतं प्रेम
तलवारीची धार असतं प्रेम
काळजातली कट्यार असतं प्रेम
खरंच काय असतं प्रेम
तुझ्या सुखात सूख बघणं असतं प्रेम
तुझ्यासाठी माझं समर्पण असतं प्रेम
....प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment