भाग मिल्खा भाग
एका आवेगाच्या क्षणी...
सुरू होते एक जीवघेणी शर्यत....
योनीच्या अंधारवाटेवर...
अगणित अनंत स्पर्मची...
शर्यत..बेफाम...जीवघेणी.... इथे प्रत्येकालाच घ्यायचाय वेध अज्ञात बीजांडाचा...
स्पर्मचा जथा चाललाय..
एकमेकांना तुडवत...
एकमेकांना लाथाडत
रोमारोमात एकच जयघोष
भाग मिल्खा भाग.....
अखेर फतेह होते एकाची
बाकीच्यांचा होतो कचरा..
जन्मसोहळा लाभे एकाला
बाकीच्यांचा होतो निचरा...
अन जन्मानंतरही ...
तेच अखंड धावणे आहे
अगदी तसेच बेफाम..जीवघेणे
फक्त इथे प्रत्येकाचे ...
बीजांड वेगळे आहे..
कुणाचे सत्ता आहे...
कुणाचे संपत्ती आहे...
जणू इथे प्रत्येकाच्या
डीएनए मध्ये
फ़क्त आणि फक्त..
धावणेच आहे..
-प्रशांत शेलटकर
-२३/०१/२०१८
अप्रतिम शब्दरचना 🙏🏻
ReplyDelete