नसशील ग तू लाखात देखणी
पण तूच माझी शुक्राची चांदणी
नसतील ग तुझे केस रेशमी
पण चुकार बट करते जखमी
नसेल ग तुझा चेहरा गुलाबी
पण सखे ग तुझे नैन शराबी
नसेल सखे तुझा ग थाट श्रीमंती
पण सखे मी श्रीमंत तुझ्या संगती
प्रशांत शेलटकर
कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी... ती नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...
No comments:
Post a Comment