नाही बोललात गोड तरी
निदान खरं खरं बोला....
आणि रस्त्यात जर भेटलात कधी तर...
निदान ओळख तरी दाखवा
मेसेज छान असतात तुमचे
यात काहीच नाही वाद....
पण घडू दे ना कधीतरी
मनाशी मनाचा संवाद...
मान्य आहे तुमचे मेसेज
असतात खासम खास
पण खरं सांगा जरबेऱ्याला
येतो का मोगऱ्याचा सुवास
एक दिवस नव्हे वर्षभर
गोड आणि गोडच बोलू...
तिळगुळाचा स्निग्ध गोडवा
आपल्या नात्यामध्ये आणू....
-प्रशांत शेलटकर
14/01/2018
No comments:
Post a Comment