Ad

Tuesday, 22 August 2023

पोकळ

हे वस्त्र भगवे केवळ
मन अजून टंच हिरवे
खोल खोल मनात अजून
घुमतात मस्त पारवे

हे केवळ खेळ भ्रमाचे
शब्दांचे केवळ  फुगे
कळले तर काहीच नाही
जरी संपली युगे

हे गणित कसले अवघड
का कधी कळते
कितीही भाग घालवा
बाकी वासना एकच उरते

ठोकून मस्त मांडी
मी निश्चयाने अगदी बसतो
नासिकाग्रे बळे बळे
मी दृष्टी लावून बसतो

पण निश्चयाची वाळू
पुनः पुन्हा निसटत रहाते
मध्यमेवरून मग निरर्थक
जपमाळ फिरत रहाते

मिटल्या डोळ्यासमोर
सुख उभे पार्थिवाचे
होते मग खमंग भजे
माझ्या ग अध्यात्माचे

जणू मी विश्वामित्र
डोळे मिटून बसलो
पण मनात नग्न मेनका
सतत चिंतीत बसलो

कसले मग देव धर्म
कसल्या ग या उपासना
कटी प्रदेशी साचल्या
युगा युगांच्या वासना

😃😃😃 

© कलाकांतसुत गोळपवाला..

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...