Ad

Sunday, 21 January 2018

आवेग

अजुनी नाही सरली रात्र, सखे तू जाऊ नको
अजुनी सखे अतृप्त गात्र, सखे तू जाऊ नको

हे श्वास माळले मी ,
श्वासात ग तुझ्या
गंध त्याचा चोरू नको
अजुनी सखे अतृप्त गात्र ,सखे तू जाऊ नको

अजूनी गंधकोषी सुगंध ,
गंध तू चोरू नको
अजुनी सखे अतृप्त गात्र ,सखे तू जाऊ नको

अजून आवेग सरला कुठे ,
उसासे तू सोडू नको
अजुनी सखे अतृप्त गात्र, सखे तू जाऊ नको

अजून चंद्र माथ्यावर,
चांदणमिठी तू सोडू नको
अजुनी सखे अतृप्त गात्र ,सखे तू जाऊ नको

--प्रशांत शेलटकर
21 जानेवारी 2016

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...