Ad

Tuesday, 24 February 2026

देव भोळा

देवभोळा..😃

देवाला जो मानत नाही 
तो असतो नास्तिक..
माझी गोष्ट जरा वेगळीच 
वेगळी नशा वेगळी किक 

मी मानतो देवाला 
पण देव मला मानत नाही
कधी गेलो देवळात
तर पायरी चढू देत नाही

म्हणतो आधी याला
पहिले बाहेर काढा..
मुळातच नव्हत्या याला
कधीच अक्कल दाढा..

नकोच हा इथे जराही
काळीज माझे धडधडते
किती हा मागतो सारखे
दिले तरी अपुरे पडते..

महाप्रसादाचा मेनू बघून
हा देवळे शोधत बसतो
 साखर फुटाणे नकोत याला 
महाप्रसाद शोधत बसतो

दोन नंबरची माया सगळी
आता भीती वाटते..
भ्रष्ट पैशाचे पाकीट यांचे
दानपेटीत रिक्त होते..

भले म्हणतो हा मी आस्तिक
या देवाला मानतो..
उदबत्त्याचे पुडे किती हा
माझ्या पुढे जाळतो..

अशा भक्तांनी विट आणला
मीच आता विट सोडतो
खराखुरा पुंडलिक आता 
गर्दी मध्ये शोधतो..

कपाळावर आठी ठेवून 
देव तडक निघून गेला
मी मानतो हो देवाला
पण देव मानेना मला...

@ प्रशांत 😃

No comments:

Post a Comment

कुंपणावरच्यास

कुंपणावरच्यास.... भलताच बिझी मित्रा पण स्टेटस मात्र बघतो कळते मला अरे वेड्या तू अंदाज मात्र बांधतो.. बंद करतोस दरवाजा  अन् खिडकी उघडी जराशी ...