Ad

Saturday, 6 January 2018

खरं सांग प्रिये...

खरं सांग प्रिये,
प्रेम म्हणजे आणखी काय असतं !
तुझ्या-माझ्यातल्या नात्याला,
आणखी काय वेगळं नाव असतं!

तू आठवतेस , प्राजक्त फुलताना
तू आठवतेस, झुल्यावर झुलताना
खरं सांग प्रिये,
फुलणं म्हणजे वेगळं काय असतं!
आणि झुलणं तरी काय वेगळं असतं
तुझ्या-माझ्यातल्या नात्याला
आणखी वेगळं काय नाव असतं

तूला पहातो धुंद शुक्रता-यात मी
तुझ्यासवे वाहतो मंद वा-यात मी
खरं सांग प्रिये,
हे धुंदावणं काय वेगळं   असतं
हे वहाणं तरी काय वेगळं असतं
तुझ्या-माझ्यातल्या नात्याला
आणखी काय वेगळं नाव असतं

---प्रशांत शेलटकर
०६/०१/२०१६
रात्र ९.००

1 comment:

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...