प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे …प्रेम असते
तुमचे आमचे मात्र कधीच सेम नसते
प्रेम म्हणजे एक गाव असतं
मैत्रीच्या पल्याड वसलेलं
प्रेम म्हणजे एक नाव असतं
काळजावर कोरलेलं …
प्रेम म्हणजे अंतरातलं अत्तर असतं
दोन मनात दरवळणार …
प्रेम म्हणजे एक मोरपीस असतं
स्मृतींच्या स्मरणिकेत जपलेलं
प्रेम म्हणजे तीच रुसण असतं
खोट खोट तरीही जीवघेण
प्रेम म्हणजे केवळ तिचच असण असतं
हव हवस आणि लोभसवाण
प्रेम म्हणजे एका छत्रीत भिजण असतं
तरीही उगाच लाजण असत
प्रेम म्हणजे अगदी जवळ असलो तरीही
अजून जवळ येण असत
-----प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment