तुझं हसणं... तुझं रुसणं
तुझं ते लाडिक बोलणं...
अजून लख्ख आठवतं
तुझं माझ्याशी भांडणं..
माझ्यावर हक्क दाखवणं...
अजून लख्ख आठवतं
तुझं ते चोरून बघणं
माझ्या नजरेत हरवून जाणं
अजून लख्ख आठवतं
तुझा तो ओझरता स्पर्श..
तुझा तो निःशब्द हर्ष
अजून लख्ख आठवतं
तुझी ती बेफाम मिठी
आणि भरून आलेली दिठी
अजून लख्ख आठवतं...
तूझं ते लाडिक पिलू म्हणणं
कधी पागल म्हणणं...
अजून लख्ख आठवतं....
अजून सार लख्ख आठवतं
म्हणूनच जगणं मुश्किल होत..
खरच तुझ्याशिवाय जगणं
मरणाचा अनुभव देत...
मरणाचा अनुभव देतं..
-प्रशांत शेलटकर
04-01-2018
No comments:
Post a Comment