Ad
Sunday, 30 June 2024
कोकनी..
Sunday, 23 June 2024
मनातलं-#४
Saturday, 22 June 2024
यौवने...
Tuesday, 18 June 2024
काळोख..
Thursday, 13 June 2024
मनातलं #-3
Saturday, 8 June 2024
दरवेळी...
तटस्थ..
तटस्थ...
निवडून घ्यावे कांदे
तशी निवडून घेतो बातमी
तरी म्हणे मी तटस्थ
नाही कुणाची गुलामी
फेकून मारू "लिंका"
विरोधकांची जाळू लंका
आपलीच वाजू दे टिमकी
आपलाच झडू दे डंका
कोण जिंकले कोण हरले
याचाच पत्ता नाही..
तरीही करू गंभीर चर्चा
अरे ही काय थट्टा नाही
रंगपेटीत दोनच रंग
पांढरा आणि काळा
सोबत दोनच पक्षी
कावळा आणि बगळा
मेंदूत यांच्या खिळे ठोकले
डावे उजवे फक्त
कोण कोणाचा गुलाम
कोण कोणाचा भक्त
माहितीचा बाजार भरला
भरून घ्या रे गोणी
का आणि कशासाठी?
विचारू नका कोणी
झेंडे उतरून खांद्यावरचे
बघा भोवती लख्ख..
दोन सोडून अनेक रंग
असतात भोवती चक्क
पंत गेले राव चढले
जुने झाले हो आता
युती करुनी भद्र-अभद्र
मिळून भोगती सत्ता
® प्रशांत शेलटकर
86 00 58 38 46
Friday, 7 June 2024
भुलू नये
Saturday, 1 June 2024
मनातलं #-2
मुंगेरी लाल
मुंगेरीलाल...😃 असाच एकदा खुर्चीवरती बसलो ताणून तंगड्या चहाचा कप देता देता किणकिणल्या नाजूक बांगड्या असेच आणि उगाचच चहाचे कप येत नसतात आधी न...
-
देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही आपल्या मान्यतेवाचून देवाचं काय अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज...
-
हे वस्त्र भगवे केवळ मन अजून टंच हिरवे खोल खोल मनात अजून घुमतात मस्त पारवे हे केवळ खेळ भ्रमाचे शब्दांचे केवळ फुगे कळले तर काहीच नाही जरी संप...
-
मी कधीचा या वेटींग रूम मध्ये बसलोय.कित्येक तास..दिवस ...महिने..वर्ष..कधी कधी वाटतं मी वेटींग रूम मध्येच जन्मलो की काय?... माझ्या आजूबाजूल...