Ad

Monday, 1 January 2018

तुझ्या संगतीने

तुझ्या संगतीने सखे
जीवन हे रंगीत झाले
हरवलेल्या सुरांचे ग
एक सुरेल संगीत झाले

बोलतेस कुठे तू ग
जणू सतार झंकारते
हसतेस कुठे तू ग
जणू चांदणे पेरीत जाते
काळोखाच्या वेलीला ग
चांदण्याचे फुल आले..
हरवलेल्या सुरांचे ग
एक सुरेल संगीत झाले

डोळ्यात वाचली ग तुझ्या
कविता माझी दिवाणी
ओठावर राहिली ग तुझ्या
माझ्या प्रीतीची निशाणी
ओठानींच ओठांना ग
कसे बंदी केले..
हरवलेल्या सुरांचे ग
एक सुरेल संगीत झाले...

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...