Ad

Friday, 22 May 2026

कुंपणावरच्यास

कुंपणावरच्यास....

भलताच बिझी मित्रा
पण स्टेटस मात्र बघतो
कळते मला अरे वेड्या
तू अंदाज मात्र बांधतो..

बंद करतोस दरवाजा 
अन् खिडकी उघडी जराशी
 नसतोच मी कशातही
करतो कशास रे  मखलाशी..

स्टेटस बघून माझे
तू बांधतोस जरी इमले 
जरा धक्का लागताच 
ढासळतात ओले किल्ले

लपून काय खेळतोस
तू डबा ऐस पैस
अरे ये ना समोर असा
जरा मोकळा  बैस

मला काय त्याचे
सोड रे अलिप्तपणा
त्यात कसला आला
कर्माचा शहाणपणा 

अंदाज कोणाचा कधी
कोणालाही ना कळला 
स्टेटस वरून वेड्या
का अखंड माणूस कळला?

भिडावे  समोर आणि
भांडावेही मनसोक्त..
बोलूनच होते मोकळे
मन हे मुक्त मुक्त..

हे पद प्रतिष्ठा पैसा
आहे श्वास जोवरी
झाल्यावर बॉडी तुझी
फक्त चार खांदेकरी

म्हणून एक सल्ला तुला
नको बसू कुंपणावरी.
ये असा गर्दीत ये 
आहेस जिवंत तोवरी ...

@ प्रशांत

Saturday, 2 May 2026

सोहळा..

सोहळा...

जाणिवेच्या पल्याड
अवीट सुखाचा ठेवा..
भाग्य मूर्तीचे दिले तू
पाषाणाच्या भाळी देवा..

सुख दुःखाचे हे वळसे
आता नकोसे विठुराया
सुखाचे नको व्यर्थ कानोसे
निरसी रे मोहमाया..

तुझ्या परी असावे 
विटेवरी मिटून डोळे
मिटल्या डोळयात मग
मिटून जाती वादळे

सरली केव्हाच मध्यान्ह
सरली केव्हाच उन्हे 
सावल्याही सरून गेल्या
 सावळ्या आता तुझेच गाणे

मिटून जावी जाणीव
नेणिवेचा जन्म व्हावा
विठू तुझ्या पायापाशी
मरणाचाच सोहळा व्हावा

@ प्रशांत

मित्राचे अध्यात्म

परवा जाता जाता रस्त्यात भेटला एक मित्र वरती बोट करून म्हणाला तिथूनच हलतात सूत्र... बायका ,पोरे ,मित्र वगैरे सगळी आहे माया  असेल तुझ्याजवळ का...