डीपी बदलतो तेव्हा...☺️
तुझा डीपी इतका सुरेख
की लिहीन म्हणतो निबंध
लागेल कदाचित पुरवणीही
शब्दांचा करीन गुलकंद
हसतात तर सगळेच मानव
पण तुझे हसणे खास आहे
काही म्हणा मात्र तुझ्यात
मोनालीसाचा भास आहे
सगळ्याच उपमा अलंकार
आता बाहेर काढणार आहे
नाहीतर तुझ्यापर्यंत येण्याचा
चान्स कुठे मिळणार आहे?
बाय द वे तुझे केस म्हणजे
सावन की काली घटा जणू
ओठ म्हणू की काय म्हणू?
हे प्राजक्ताचे देठ जणू
भुवयांचे धनुष्य म्हणू की
नजरेचे भेदक बाण म्हणू
मेनकेलाही कॉम्प्लेक्स यावा
अशी सौन्दर्याची खाण म्हणू
बघ ना तुझा डीपी बघून
कल्पनेचा मोर कसा नाचतो
नाचता नाचता बिचारा
ये दिल मांगे मोअर म्हणतो
आता काही चतुर मोर
इनबॉक्स मध्ये येतील
जेवलीस का म्हणून अगत्याने
चौकशी नक्की करतील
नकोच काही सांगू त्याना
ते पान वाढायला घेतील
नको नको म्हणताना
आग्रह करून वाढतील
जाम कंटाळीस ना तू ?
मग ऐक माझा सल्ला
ऐकलास माझा सल्ला
तर थांबेल हा कल्ला...
नवऱ्यासोबतचा छान फोटो
पुढच्या वेळी ठेव डीपी
इतका छान असू देत की
मोरांचे वाढेल बीपी
म्याओ म्याओ करत
मोर रानात जातील
सुटले बाबा एकदाची म्हणून
तू मोकळा श्वास घेशील...
© प्रशांत शेलटकर
8600583846