💞...तू...💕
तू आठवतेस
तू हसवतेस
तू रडवतेस सुद्धा
तू नसताना..
तुझा आवाज
तुझा साज
तुझ्या बटा
डोळ्यासमोर असतात
तू नसताना...
तुझी मैत्री?
की तुझं प्रेम?
प्रश्न पडतात मला
तू नसताना...
हे स्पंदन
ही धडकन
थांबतच नाही
तू नसताना
हे वैराग्य
ही विरक्ती
ही सगळी नाटकं
फक्त तू नसताना...
हा पाऊस
हा गारवा
हा उनपाऊस असावा
तू असताना...
हा वसंत
हा आसमंत
बहरून जावा
तू असताना...
हा हळवेपणा
हा भारले पणा
ह्या ओल्या पापण्या
फक्त तू नसताना
तुला कसं सांगू
तुला केव्हा सांगू
आणि मुळात का सांगू
तू नसताना...
पण कधीतरी
केव्हातरी..कुठेतरी
विचारीन म्हणतो तुला
तू असताना...
❤️-प्रशांत ..💕
No comments:
Post a Comment