Ad

Tuesday, 5 September 2023

ती आवडते मला...

ती आवडते मला...


ती आवडते मला
जशी आहे तशी
जिथे आहे तिथे..
अगदी पाठमोरी सुद्धा
ती आवडते मला...

ती विस्कटलेल्या
केसांची राजकन्या
ती खट्याळ हास्याची 
निरागस निर्मलकन्या
ती आवडते मला..

तिचा आवाज..
कानात घंटा किणकिणतात
हा कानातला रोमान्स
आवडतो मला ..आणि ती?
तीही आवडते मला...

ती सुखाचे डेस्टिनेशन
छत्तीस गुणांचे परफेक्शन
नावडण्या सारख काहीच नाही
ती आवडते मला...

तिची ती छचोर बट
राग करतो मी तिचा
किती सलगी करावी ना गालांशी
पण त्या बटेसहित 
ती आवडते मला

फक्त आवडते की 
अजून काही?
की खोल खोल मनात
रुतले काही?
माहीत नाहीच तरीपण
ती आवडते मला..

डोळे मिटले की
उत्तर मिळते
मग का उगाचच 
 व्यक्त व्हायचे असते
फक्त तिला हेच सांगायचे की
ती आवडते मला...
ती आवडते मला...😊

-प्रशांत ❤️

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...