स्किझो....
माझ्यातला मी
मलाच प्रश्न करतो
कोण तू?
मी स्किझो...
माझ्यातला तो
मलाच उत्तरतो
तो तूच...
तोच म्हणतो मला
तू सिद्धपुरुष..
तुला दिसत सगळं
जे जगाला नाही दिसत..
भयंकर हसून
मी म्हणतो मलाच
नाही रे... मी स्किझो...
कळत नाही रे
माझे मला
मी हा की मी तो?
हे सत्य की ते सत्य?
कोणत्या सत्याशी
स्टिकप राहू...?
हेच सत्य...
कारण दुसरे असत्य
दुसरे असत्य
कारण हेच सत्य
साला केमिकल लोचा
डॉक्टर म्हणालेच परवा
स्किझोफ्रेनियाची केस आहे
म्हणे माझ्यात दोघेजण आहेत
साले काय जोक करतात..
जगातले सगळेच स्किझो...
आत एक आणि बाहेर एक..
पुढ्यात एक मागे एक..
मी मात्र प्रामाणिक
माझ्यातल्या दोघांसोबत
दोघांचे अस्तित्व..
प्रखर वास्तव
झगझगीत..
दुपारच्या उन्हासारखे..
म्हणे मी स्किझो..
अरे तुम्ही पण स्किझोच
मेंदूतली स्वार्थाची पेशी
जिवंत असलेले..
बदमाश स्किझो..
व्याख्येच्या पलीकडले...
आणि मी????
कोण मी?????
मी स्किझो.....
केसपेपर वर पाहिलं मी परवा
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment