Ad

Thursday, 21 September 2023

हाजमोला...

हाजमोला....😊

नाईस.. ऑसम..वाह वाह
असलं मी काही म्हणणार नाहीये
तू तुझा डीपी कितीही
सुंदर (?) ठेवलास तरीही...

मी तुला गुड मॉर्निंगसुद्धा 
करणार नाहीये..
सकाळ किती का सुंदर असेना
आणि हो ...
कशाला ते गुड नाईट...
सगळ्याच नाईट एकसारख्या..

हॅव अ नाईस डे
कशाला हवं ना प्रत्येक दिवशी
वैतागलेला आणि विस्कटलेले
दिवस आज काल खूपच..

फक्त डीपिसाठीचे ते
टुचुक भर स्माईल..
तेच  ते धार गेलेले बोथट झालेले
नजरेचे तथाकथित बाण...
कोण शिंचा घायाळ होणार?

व्हर्चुअल फेटे उडवायला
तू कुठल्या गल्लीतील
अमृता..माधुरी.. गौतमी
गेला बाजार सुरेखा..

तूला म्हणे आजकाल
लाईकचेच ओझे झालंय
तुझ्या ओझ्यात भर अजून ?
छे छे असलं पाप 
नाही होणार माझ्याकडून

गोड गोड कमेंटीची
बासुंदी वाढायला
वाढपी खोळम्बले आहेत
सोशल मीडियाच्या मंडपात
तू चूळ भरलीस तरी
ऑसमच्या पायघड्या
तयार आहेतच ग..

पण काय असत ना
स्तुतीचा ओव्हरडोस
रोजचाच असतो ग
अपचन झाले तर असावी
कधीतरी केव्हातरी
 टीकेची हाजमोला
एकदम पाचक आणि कडक
म्हणून तर हे सर्व....
कळतंय ना??

😄😄😄😄😄😄

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...