Ad

Saturday, 29 December 2018

झिम्माड

अशी पावसात चिंब
भिजून ये सखे...
गात्रांत वीज अशी
पेरून ये सखी...

ढळलेला पदर तसाच
राहू दे ग सखी..
ओलेतीच ग तुला
पाहू दे ग सखी..

बट ओल्या गालावरची
राहूदे तशीच सखी...
आषाढ तुझ्या ओठांवरचा
ओठांनी या टिपू दे सखी..

वीज तुझ्या नजरेतली
खेळू दे ग सखी...
नक्षी तुझ्या देहाची
अशी पाहू दे सखी

तनुविणा तुझी अशी
झंकारु दे ग सखी
कंपने त्याची देही माझ्या
भिनू दे सखी..

हा मदिर पाऊस कधी
न थांबू दे सखी...
घन ओठांवर थांबलेला
चुंबू दे सखी...

ओले नि:श्वास तुझे
जाणवती इथे सखी
गालावर त्याची माझ्या
कित्येक फुले सखी...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8609583846/29/12/18

आयुष्याच गणित

आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही

जी आपल्याला हवी आहे
तिला आपण नकोच असतो
जी आपल्याला नकोच आहे
तिला आपण हवेच असतो
केले किती नवस सायास
आपल्याला ते फळत नाही
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही...

छत्री घेऊन बाहेर जावं तर
पाऊस नक्की पळून जातो
बिनछत्रीचे बाहेर जावं तर
पाऊस चिंब भिजवून जातो
या ऊनपावसाचं अन माझं
कध्दी कध्दी जुळत नाही...
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही

लायनीत थांबून बराच वेळ
जेव्हा कधी नंबर येतो...
खिडकी मागचा क्लार्क मात्र
तेव्हाच खिडकी बंद करतो
योगायोगाच हे गणित
मलाच कसं कळत नाही..
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही....

लपाछपीच्या या खेळाला
आता मात्र सरावलो आहे..
लपलेल्या सुखालाच आता
मस्त भोज्जा देत आहे..
रमत गमत चालतोय मी
सुखामागे आता पळत नाही
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/29/12/18

Monday, 24 December 2018

जरी न कधी..

जरी न तू माझी कधी
तरी मी तुझाच आहे
डोळ्यात तुझ्यासाठी
आसवांचा पहारा आहे

जरी न मी तुझ्या ग
कधी अंतरात उतरलो...
मात्र माझ्या अंतरात तू
कधीच वसली आहे...

जरी तू न मला कधी
स्वप्नात पाहिले..
तुलाच मी नित्य
स्वप्नात पाहतो आहे

जरी अनोळखी मी
तुला होत चाललो
तुझ्यासाठी अनोळखी
माझाच मी होत आहे

जरी न कधी मिळणार
भिन्न वाटा आपुल्या
वाट तुझ्या होकाराची
अधीर मन पाहत आहे

- प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/25/12/18

कधी आलीस तर...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
की थोडी तुला, माझ्या मिठीत
अशी अलगद सोडून जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा.....
की गंध तुझ्या गजऱ्याचा
श्वासात माझ्या माळून जा..

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा...
की ,कर्ज तुझ्या नर्मओठांचे
ओठांवर माझ्या देऊन जा...

कधी आलीस सहज तर,
अशी येऊन जा.....
की रेशमी केसांची एखादी बट
छातीवर माझ्या सोडून जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
तुझ्या काजळाची तीट माझ्या
गालावर लावून जा....

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा..
आठवणींचे चार अलवार थेंब
डोळ्यामध्ये घेऊन जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
युगा युगांची अनावर ओढ
काळजात घेऊन जा....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846/25/12/18

Wednesday, 19 December 2018

अव्यक्त

बागेतल्या झाडावर
गुलाबाचं फुल येत...
स्पर्श करावासा वाटतो
पण आपण तो करत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

मध्येच कधी रस्त्यात
ती अवचित भेटते...
खुशालीच बरच काही
मनमोकळं बोलते..
ती गेल्यावर ,मागे वळून
तिच्याकडे पहावस वाटत
पण आपण तसं करत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

तिचा डीपी, तीच स्टेटस
आपल्याला आवडत जातं
काळजात खोल काहीतरी
हवंहवंसं  फुलत जात
हे सारं तिला,सांगावस वाटतं
पण आपण ते सांगत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

मग याची सवय होते
मौनातली गंमत कळते
तिच्या केवळ असण्याने
जगण्याचे मग अत्तर होते,
अत्तराची बंद कुपी...
मग आपण उघडतच नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/19/12/18

Saturday, 15 December 2018

ना बुद्ध समजला...

ना बुद्ध समजला
ना कृष्ण समजला
मला फक्त माझा,
स्वार्थ समजला....

ना राम समजला
ना महावीर समजला
मला फक्त माझा
स्वार्थ समजला....

ना येशू समजला
ना नानक समजला
मला फक्त माझा
स्वार्थ समजला...

ना देव समजला
ना प्रेषित समजला
मला फक्त माझा
स्वार्थ समजला

ना तुका  समजला
ना कबीर समजला
मला फक्त माझा
स्वार्थ समजला....

धर्म ना कळला मज
ना पंथ समजला
मला फक्त माझा
स्वार्थ समजला...

देव न समजला अन
ना माणूस उमगला
मला फक्त माणसातला
हैवान भावला...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/15/12/18

Wednesday, 12 December 2018

काहीच कळत नाही

मला राजकारण ....
समजत नाही
मला अर्थकारण....
समजत नाही
मला धर्म ....
कळत नाही
मला संस्कृती ....
उमगत नाही
मला साहित्य ....
कळत नाही
मला समीक्षा .....
कळत नाही
मला कला .....
कळत नाही
मला क्रीडा
जमत नाही....
मला वैद्यक....
समजत नाही
मला समाज ....
समजत नाही
तरीही मी अधिकाराने बोलतो
तरीही मी अधिकाराने लिहितो
कारण....
मला काहीच कळत नाही
हेच मला अजूनही कळत नाही

-प्रशांत शेलटकर

काहीच कळत नाही

मला राजकारण ....
समजत नाही
मला अर्थकारण....
समजत नाही
मला धर्म ....
कळत नाही
मला संस्कृती ....
उमगत नाही
मला साहित्य ....
कळत नाही
मला समीक्षा .....
कळत नाही
मला कला .....
कळत नाही
मला क्रीडा
जमत नाही....
मला वैद्यक....
समजत नाही
मला समाज ....
समजत नाही
तरीही मी अधिकाराने बोलतो
तरीही मी अधिकाराने लिहितो
कारण....
मला काहीच कळत नाही
हेच मला अजूनही कळत नाही

-प्रशांत शेलटकर

मौन

मौन..

बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
जसा बोलतो मी स्वतः शी
तसा मी आतून उलगडत आहे

देत आहे जोवरी मी
तोवरी मी  देव आहे..
कधी कणभर मागता
मी दानव ठरलो आहे
वागण्याचे तुझ्या कोडे
आता मज उलगडत आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे

जे कधी ना प्राक्तनी
ते कधीच मिळणार नाही
कौतुकाने कधीच कोणी
मजवर भाळणार नाही
उजेडाचे पालिते विझवुनी
आता अंधार पांघरतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे

हार फुलांचा नकोच होता
सोस मज पाकळीचाच होता
तुझ्यासाठीच एक दिवा
काळजात लावला होता
लावलेला तोच दिवा..
आता मीच मालवतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे

प्रेम केले तुझ्यावर निरंतर
तरी तू ठेवलेस अंतर..
अंतरातले देखणे चित्र तुझे
आता पुसू पाहतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे

बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
जसा बोलतो मी स्वतः शी
तसा मी आतून उलगडत आहे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
रत्नागिरी 8600583846

Sunday, 2 December 2018

हल्ली मी सुद्धा

हल्ली मी सुद्धा,
अपेक्षा ठेवत नाही
मी gm केल्यावर
तू लगेचच gm करण्याची
तुझ्या सवडीने तू ...
रात्रीसुद्धा करू शकतेस gm

हल्ली मी सुद्धा ,
पहात नाही तुझं last seen
तू माझ्यासाठीच online
येतेस या भ्रमात नाही मी..

हल्ली मी सुद्धा...
विचारत नाही तुला तेच
वांझोटे प्रश्न ...
जेवलीस का?
ब्रेकफास्ट केलास का?
कुठे आहेस? काय करतेस?
कारण मला माहित आहेत
वांझोट्या प्रश्नांची..
वांझोटी छापील उत्तरे..

हल्ली मी सुद्धा,
हिशेब ठेवत नाही
कुणाच्या like चा
सरावाने करतात माणसं
हल्ली सहज like...

हल्ली मी सुद्धा ,
बंद केलंय तुझे स्टेटस पाहणं
कागदी फुल सुगंध देत नाहीत
पक्क माहीत आहे मला...

हल्ली मी सुद्धा,
बनवलीय तुझ्यासारखीच
Priority list माझ्यासाठी
फरक इतकाच की
पाहिलं आणि शेवटचं नाव
फक्त आणि फक्त माझंच आहे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...