आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही
जी आपल्याला हवी आहे
तिला आपण नकोच असतो
जी आपल्याला नकोच आहे
तिला आपण हवेच असतो
केले किती नवस सायास
आपल्याला ते फळत नाही
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही...
छत्री घेऊन बाहेर जावं तर
पाऊस नक्की पळून जातो
बिनछत्रीचे बाहेर जावं तर
पाऊस चिंब भिजवून जातो
या ऊनपावसाचं अन माझं
कध्दी कध्दी जुळत नाही...
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही
लायनीत थांबून बराच वेळ
जेव्हा कधी नंबर येतो...
खिडकी मागचा क्लार्क मात्र
तेव्हाच खिडकी बंद करतो
योगायोगाच हे गणित
मलाच कसं कळत नाही..
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही....
लपाछपीच्या या खेळाला
आता मात्र सरावलो आहे..
लपलेल्या सुखालाच आता
मस्त भोज्जा देत आहे..
रमत गमत चालतोय मी
सुखामागे आता पळत नाही
आयुष्याचं एक गणित
मला कधी कळत नाही
जे नकोच आहे कधी
ते कधी टळत नाही
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/29/12/18
No comments:
Post a Comment