Ad

Sunday, 2 December 2018

हल्ली मी सुद्धा

हल्ली मी सुद्धा,
अपेक्षा ठेवत नाही
मी gm केल्यावर
तू लगेचच gm करण्याची
तुझ्या सवडीने तू ...
रात्रीसुद्धा करू शकतेस gm

हल्ली मी सुद्धा ,
पहात नाही तुझं last seen
तू माझ्यासाठीच online
येतेस या भ्रमात नाही मी..

हल्ली मी सुद्धा...
विचारत नाही तुला तेच
वांझोटे प्रश्न ...
जेवलीस का?
ब्रेकफास्ट केलास का?
कुठे आहेस? काय करतेस?
कारण मला माहित आहेत
वांझोट्या प्रश्नांची..
वांझोटी छापील उत्तरे..

हल्ली मी सुद्धा,
हिशेब ठेवत नाही
कुणाच्या like चा
सरावाने करतात माणसं
हल्ली सहज like...

हल्ली मी सुद्धा ,
बंद केलंय तुझे स्टेटस पाहणं
कागदी फुल सुगंध देत नाहीत
पक्क माहीत आहे मला...

हल्ली मी सुद्धा,
बनवलीय तुझ्यासारखीच
Priority list माझ्यासाठी
फरक इतकाच की
पाहिलं आणि शेवटचं नाव
फक्त आणि फक्त माझंच आहे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...