Ad

Wednesday, 19 December 2018

अव्यक्त

बागेतल्या झाडावर
गुलाबाचं फुल येत...
स्पर्श करावासा वाटतो
पण आपण तो करत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

मध्येच कधी रस्त्यात
ती अवचित भेटते...
खुशालीच बरच काही
मनमोकळं बोलते..
ती गेल्यावर ,मागे वळून
तिच्याकडे पहावस वाटत
पण आपण तसं करत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

तिचा डीपी, तीच स्टेटस
आपल्याला आवडत जातं
काळजात खोल काहीतरी
हवंहवंसं  फुलत जात
हे सारं तिला,सांगावस वाटतं
पण आपण ते सांगत नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

मग याची सवय होते
मौनातली गंमत कळते
तिच्या केवळ असण्याने
जगण्याचे मग अत्तर होते,
अत्तराची बंद कुपी...
मग आपण उघडतच नाही
प्रेम हे असंच असतं
व्यक्त करावंसं वाटत
पण आपण ते करत नाही..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/19/12/18

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...