Ad

Monday, 24 December 2018

कधी आलीस तर...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
की थोडी तुला, माझ्या मिठीत
अशी अलगद सोडून जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा.....
की गंध तुझ्या गजऱ्याचा
श्वासात माझ्या माळून जा..

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा...
की ,कर्ज तुझ्या नर्मओठांचे
ओठांवर माझ्या देऊन जा...

कधी आलीस सहज तर,
अशी येऊन जा.....
की रेशमी केसांची एखादी बट
छातीवर माझ्या सोडून जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
तुझ्या काजळाची तीट माझ्या
गालावर लावून जा....

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा..
आठवणींचे चार अलवार थेंब
डोळ्यामध्ये घेऊन जा...

कधी आलीस सहज तर
अशी येऊन जा....
युगा युगांची अनावर ओढ
काळजात घेऊन जा....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846/25/12/18

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...