Ad

Friday, 4 September 2026

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी...

आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दोन्ही पंगतीत जेवणारे वऱ्हाडी आहोत..आम्ही ते बलराम आहोत..की जे महाभारत युद्धात ना कौरवांच्या ना पांडवांच्या बाजूने.उभे राहिले .... युद्ध करण्यापेक्षा शेती बरी म्हणून आम्ही थेट शेतावर गेलो..आम्ही ते अर्जुन आहोत की आमच्या प्रश्नांची उत्तरे तो युगंधर कृष्ण पण देऊ शकणार नाही कारण आम्ही  फार मोठे शहाणे नाही लागून गेलो ..पण आमच्याकडे उत्तरे समजून घेण्याची  बेसिक क्षमता नाहीये .म्हणून आम्ही अज्ञेयवादी आहोत..
         आहे आणि नाही याच्या पलीकडे तिसरी मिती असावी..असावी की नसावी हे माहीत नाही म्हणून आम्ही अज्ञेयवादी आहोत..आम्ही ते साक्षीदार आहोत की आम्हला हो किंवा नाही एवढीच उत्तरे नाही देता येत..हो आणि नाही याच्यामध्ये काहीतरी असते ...पण काय असते हे आम्हाला माहीत नसते म्हणून आम्ही अज्ञेयवादी आहोत..मुळात आमची जमात निरुपद्रवी असते..कोणतीच भूमिका न घेणे हीच आमची भूमिका असते..मुळात हेच ट्विस्ट असते म्हणून ना आम्ही इकडचे ,ना आम्ही तिकडचे आम्ही त्याही पलीकडचे म्हणून आम्ही अज्ञेयवादी आहोत....
      आम्ही अज्ञेयवादी आहोत तेच बरे आहे..कारण आम्ही देव आहे का नाही हा कठीण प्रश्न ऑप्शनला टाकलेला आहे.इतर छोटे छोटे प्रश्न सोडवून जीवनाच्या परीक्षेत आम्ही जेमतेम काठावर पास होतो..त्यात आम्ही सुखी आहोत कारण आम्ही अज्ञेयवादी आहोत...देवाच्या अस्तित्वाचे प्रश्न आस्तिक आणि नास्तिक सोडवू बापडे.. आम्हाला आमचे अस्तित्व टिकले तरी खूप झाले.. आम्हाला आमचे अस्तिकत्व किंवा नास्तिकत्व आयुष्यभर सिद्ध करत रहावे लागत नाही..मुळात लोकांचे आमच्याकडे लक्षच नसते.जसे महाभारतात कृष्ण..कौरव..पांडव लक्षात राहिले बलराम दुर्लक्षित राहिला..तसेच आम्ही कलियुगातले बलराम आहोत..जगाचे वेगळे चाललेले असते आणि आमचे वेगळे चाललेले असते. आम्हाला ग्लॅमर नाही ..लाईम लाईट नाही..आम्ही दिवस नाही आम्ही रात्र नाही  आम्ही फक्त एक संधिप्रकाश आहोत..कारण आम्ही अज्ञेयवादी आहोत

@ प्रशांत

No comments:

Post a Comment

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...