प्रेम करावे राधेसारखे...
बासरीच्या सुरावर
प्रेम करावे मीरेसारखे
विषाच्या प्याल्यावर...
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
प्रेम करावे तिच्यावर
तिचे नसले जरी ...
प्रेम करावे त्याच्यावर
त्याचे नसले तरी...
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
प्रेमात कधी अट नसते
अन प्रेम म्हणजे नसतो करार
प्रेमात असतो एकमेकांना
फक्त एकमेकांचाच आधार...
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
प्रेम करावे कोणावरही...
फुलावर अन काट्यांवरही
अन खुशाल प्रेम करावे
विस्कटलेल्या नात्यांवरही..
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
साजरे तर सगळेच करतात
पलीकडून आलेला होकार..
जिंदा दिल तेच असतात...
जे साजरा करतात नकार...
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
तू माझी आहेस यापेक्षा
मी तुझा आहे...
हेच किती गोड आहे
बरसून शून्य होण्यातच
मेघाला धरणीची ओढ आहे
कारण प्रेम ही ,
देण्याचीच गोष्ट आहे...
फक्त देण्याचीच गोष्ट आहे..
-प्रशांत शेलटकर ©
No comments:
Post a Comment