मग मोराने काय करावे?
मग मोराचे काय करावे?
मोर नाचतोय..
प्रेक्षकपण आहेत..
काही समोर..काही मागे..
पण समोरचे मागे
आणि मागचे समोर
कधीच येत नाहीत..
जणू त्यांच्या पायात
खिळे ठोकले आहेत..
त्यांच्या त्यांच्या पित्यांनी
जे पुढे आहेत त्यांचा जल्लोष
अखंड अविरत चालू आहे..
मोर छान आहे सुंदर आहे..
आमचा मोर जगात भारी
सगळ्यात सुंदर..
पूर्वी त्याचा आवाज दबलेला
घुसमटलेला ..खोल गेलेला
आता मोर बदलला आहे..
त्याचा केकारव सर्वदूर...
ये दिल मांगे मोर...
जे मागे आहेत
त्यांचा विलाप चालू आहे..
शी ss याक किती घाण..
खूपच डर्टी झालाय मोर..
पूर्वी असा नव्हता मोर..
आता तो कुरूप झालाय..
नको आता इथे रहाणे..
भिती वाटते मोराची...
आता मोराने काय करायचे?
की मोराचे काय करायचे?
नाचत नाचत गोल फेरी मारावी?
सांगावे दोन्ही बाजूला..
मला पूर्ण बघा रे मित्रानो
मागचे पुढे या..
पुढचे मागे जा...
कदाचित कळेल मग..
मी जसा आहे तसा..
पण पब्लिक काही ऐकत नाही
आपली जागा सोडत नाही..
पुढचे म्हणतात आमचे बरोबर
मागचे म्हणतात आमचे बरोबर
मग मोराने काय करावे?
मग मोराचे काय करावे?
आकाशाकडे पाहत रहावे
आभाळ भरून यायची???
@ प्रशांत..
No comments:
Post a Comment