Ad

Monday, 26 January 2026

निळ्या...

गणेश गुळ्याचा किनारा भर दुपारी भटकताना सुचलेलं काहीतरी...

निळ्या....

एकटा मी..
एकटा हा किनारा..
समोर हा अथांग
निळानिळा नजारा...

निळे टेकले ते
खालच्या निळ्याला 
निळ्याने दिली बहुतेक 
निळाई भवताला...

निळी लाट स्पर्शते 
अनावृत्त पावलांना
शुभ्र ओली वाळू..
अलगद सरकताना

सुखाच्या उभारत्या लाटा 
दुःखाचा अटळ परतावा
कधी टोचतो काटा..
कधी ऋतू फुलांचा बरवा

कित्येक आल्या लाटा..
कित्येक परतून गेल्या
जिथून त्या आल्या
तिथेच त्या निमाल्या

वाळूत रुतवून पावले
मी खेळ निळ्याचा पाहतो
विरघळून सर्व रंग..
एक निळाच आत उरतो..

@ प्रशांत

No comments:

Post a Comment

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...