पुस्तकी अंधश्रद्धा सर्वात जास्त घातक..
सध्या धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा पुस्तकी अंधश्रद्धांना जास्त उत आलाय.. आपल्या विचारसरणीला अनुकूल अशीच पुस्तक वाचायची.. खुश व्हायचं..छाती फुलवायची आणि लोकांना अगदी थाटात विचारायचं अरे हे पुस्तक वाचा म्हणजे खर काय ते कळेल..
पुस्तकात छापलय...अमक्या तमक्यांनी लिहिलंय...म्हणून हे सत्य आहे ..ही एक प्रकारची अंधश्रद्धाच..आपण जे वाचतो ते कोणत्या काळातल आहे? लेखकाची विचारसरणी कोणती आहे? त्याचे व्यक्ती गत आयुष्य कोणत्या अनुभवातून गेलंय. त्याच्यावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव आहे.? त्याने संदर्भ म्हणून कोणते ग्रंथ वाचले आहेत?ते कितपत विश्वासार्ह आहेत ? त्याने जे लिहिलंय ते आजच्या काळाला किती लागू आहे?याचा विचार पुस्तक वाचताना करायला हवा..तथागत सांगून गेले की स्वयंप्रज्ञ व्हा..स्वतः विचार करायची सवय ठेवली तर उसन्या विचारांवर पांडित्य मिरवण्याची वेळ येत नाही.
माणसांची विभागणी ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीने कधीच करायची नसते, मूळ माणूस हा अनेक भावना,विचार,गुण आणि दोषांची सरमिसळ असल्याने.माणसांचे संघ,समूह,धर्म, राजकीय पक्ष हे देखील एकसाची ,सरसकट एकाच विचाराचे नसतात. त्यातही परस्परविरोधी आंतरप्रवाह असतातच.
सम्यक विचार मांडणारी खूप कमी माणसे आणि पुस्तके असतात. एकांगी ,एकतर्फी विचारांची पुस्तके जाणीवपूर्वक प्रकाशित केली जातात. माणसांचे निर्बुद्ध कळप व्हावेत,आणि कळप वाढावेत ते एकदा वाढले की हुकूमशाही असो की लोकशाही सत्तेत येणे सोपं जातं..हे पाहता कोणताही विचार लगेच न स्वीकारता.. काही काळ अंडर ऑब्झरव्हेशन खाली ठेवला पाहिजे..
-प्रशांत
No comments:
Post a Comment