राजकीय व्यक्तींबद्दलचा टोकाचा द्वेष एकूण परसेप्शनच बदलवून टाकतो..आपला विचार करण्याचा अँगलच रिजिड बनवतो.. तटस्थता निघून जाते..अलिप्तता निघून जाते..स्वप्नाळू पॉझिटिव्हिटी किंवा स्वप्नाळू निगेटीव्हिटी यात आपण अडकून पडतो.व्यक्ती कशी आहे या पेक्षा माझ्या मनातल्या प्रतिमेसारखी ती असायला हवी ही भावना इतकी प्रबळ होते की ती प्रतिमा हेच वास्तव वाटते. आणि जे मनात असत तेच आजूबाजूला दिसत जातं अस कुठे तरी मानसशास्त्रात वाचलं होतं..फेसबुक सुद्धा तुमचा सर्च बघून माहितीची पेशकश करत असते.आणि विशेष म्हणजे आपला मेंदू साच्यात अडकला आहे हेच कळत नाही..
समविचारी मित्र असणे हे काहीवेळा तोट्याचे असते. दोन समविचारी मित्र असले तर विचारांची बेरीज होते. पण दोन पेक्षा अधिक समविचारी मित्र एकत्र आले तर विचारांचा गुणाकार होत जातो. आपण आभासी विश्वात हरवून जातो.. विरोधी विचाराचे मित्र तुमच्या विचारांची चिकित्सा करतात. तुम्हाला डाऊन टू अर्थ ठेवतात.
आपल्या मनात जी लाडकी गृहीत असतात त्याला कोणी छेद दिलेलं आपल्याला आवडत नाही.ते स्वतःच्या बौद्धिक अस्तित्वाला आव्हान वाटते. स्वतःची मते म्हणजे वास्तव नसते.मग काहीही करून ते नाकारत बसणे ,ट्रोल करणे , जस आहे तसे न बघता जस हवं तसं पाहिलं जातं.
टोकाच प्रेम आणि टोकाचा द्वेष हानिकारकच असतो , पण ती नशा इतकी बेमालुमपणे चढत जाते.आपलं आपल्याला समजतच नाही
© प्रशांत
No comments:
Post a Comment