खरे तर भारत आणि इस्रायल याची तुलना करू नये.. खूप भिन्नता आहे दोन देशात..म्हणून बघा बघा इस्राईल मध्ये असे असे...नाहीतर आपल्या कडे बघा...असे निराशेचे सूर लावण्यापेक्षा दोन देश किती वेगळे आहेत ते बघा
1. इस्राईल चे आकारमान पुणे जिल्ह्याच्या दीडपट आहे
आणि लोकसंख्या 25 लाख ..आपली 130 करोड प्लस , क्वांटिटी वाढली की क्वालिटी कमी होते हे प्रिन्सिपल लोकसंख्येच्या बाबतीत देखील सत्य आहे.
2. इस्राईल हा अगदी तरुण देश आहे.ज्या ध्येयाने सगळे ज्यू एकत्र आले आहेत ते अगदी ताजे आहे. त्यामुळे 24 x 7 देशप्रेम हे नैसर्गिक आहे.आपले तसे नाही आपला देश प्राचीन आहे. अनेक आक्रमणे अनेक शतके सहन करून आपण उभे आहोत त्यामुळे थोडा "अशक्तपणा" आपल्यात आलाय
3. इस्रायलला एक धर्म आहे.ते फक्त ज्यू राष्ट्र आहे.एकाच धर्माची राष्ट्रे चांगल्या आणि वाईट अर्थाने कट्टर असतात.एक धर्म,एक पंथ,एक प्रेषित एक धर्मग्रंथ देशाला कट्टर बनवतात .धर्मच कशाला एक आणि एकच विचारसरणी सुद्धा देशाला कट्टर बनवते..उदा.चीन .या बाबतीत आपले अगदी वेगळे आहे..वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र नांदणे हे आपल्या जीन्स मध्येच आहे त्यामुळे कुठल्याही घटनेवरचे आपले प्रतिसाद भिन्न असतात.. प्रबळ असतात.आणि ते वेळ घेऊन येतात . बघा प्लासीची लढाई 1757 ची ,पेशवाईचा अस्त 1818 पहिले बंड 1857 आणि स्वातंत्र्य 1947 .इंग्रज आपले शत्रू आहेत हे समजायला 100 वर्षे आणि त्या नंतरचा लढा 100 वर्षे...देशाचा आकारमान, देशाची लोकसंख्या, देशाच्या विचारधारा यामध्ये प्रत्येक देश वेगळा असतो.
4. चारही बाजूने शत्रू असणे आणि देशाला नैसर्गिक संरक्षण असणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. इस्राईलला नैसर्गिक सरंक्षण जवळजवळ नाहीच , सीमा रेषा अगदीच लहान त्यामुळे 24 x 7 सजग रहाणे आवश्यक आणि नैसर्गिक आहे. सततची प्रतिकूल परिस्थिती मानसिकता कणखर बनवते.उलट भारताला नैसर्गिक संरक्षण व्यवस्था आहे तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालय आजच्या तंत्रयुगात त्याला फार अर्थ राहिला नसला तरी हजारो वर्षे शत्रूला भारतावर आक्रमण करणे सोपे नव्हते. आणि अशी ही नैसर्गिक संरक्षण व्यवस्था मानसिकतेवर नक्की परिणाम करते.
इस्रायल आणि भारत याची तुलना म्हणूनच करू नये.प्रत्येक देश वेगळा असतो जसा प्रत्येक माणूस वेगळा असतो तसेच...आपली स्ट्रेंथ वेगळीच आहे..
© प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment