अनय..
लोक करतात राधे राधे
पण त्या अनयच काय
दुःख त्याचे मूक अनावर
कोण लक्षात घेत काय?
सात फेरे आणि आहुती
त्यानेही दिली असेलना
सुखी संसाराची स्वप्ने
त्यानेही पाहिली असतील ना
शरीर इकडे आत्मा तिकडे
अवघा प्रपंच झाला कलेवर
निळाईत बायको रमली
कुणाला ना त्याचा गहिवर
अशी कशी नियती चुकली
व्यर्थच झाले सात फेरे
भांगेत सिंदूर भरताना
राधेचा का हात थरथरे?
इतिहासाच्या पानावरती
अनयची त्या नोंद कुठे?
असेल त्याचेही प्रेम तिच्यावर
पण तिलाही ते कळले कुठे?
मिळून सारे सरून गेले
गंगेकाठी तृषार्त अनय
मनातला मनातच राहिला
गोकुळात एकाचा प्रणय
-प्रशांत
8600583846
No comments:
Post a Comment