Ad

Tuesday, 28 May 2024

काटा रुते न कुणाला

काटा रुते न कुणाला...

माहितीचा अतिप्रचंड ओघ हे सामाजिक संवेदना बोथट होण्याचे एक कारण आहे, आयुष्य इतके गतीमान झालेय की एखाद्या घटनेवर व्यक्त व्हायला सुद्धा वेळ मिळत माही, निर्माण झालेली संवेदना टिकत नाही त्यामुळे त्यावर कृती करायला वेळ नाही. परस्परविरोधी माहिती इतकी येत असते की त्याची संगती लावताना मेंदू थकत जातो. पूर्वी सगळी सामाजिक अस्वस्थता चळवळीच्या रूपाने व्यक्त व्हायची.आता एखाद्या संवेदनशील प्रश्नावर  समक्ष एकत्र येण्यापेक्षा सोशल मिडियाद्वारे आपली अस्वस्थता व्यक्त करता येते.(ही पोस्ट पण त्याच वर्गात जाऊन बसण्याची शक्यता आहे) अर्थात हे वाळूत पाणी ओतण्यासारखे असते. अस्वस्थतेला मूर्त रूप येत नाही ती अमूर्त रहाते. एक रडका ईमोजी मी संवेदनशील असल्याचे सिद्ध करत असल्याने आणि तेवढंच सिद्ध करायचे असल्याने पुढे काही होत नाही.क्लीन इंडिया , लातूरच्या युवकांचे हरित लातूरचे स्वप्न  यासारख्या पोस्ट ना लाईक केले ,शेअर केले की पुढे प्रत्यक्ष कुदळ-फावडी घेऊन झाडे लावायची गरज वाटत नाही.तेच स्वच्छतेबाबत आहे.रस्त्यावर पडलेली प्लॅस्टिकची पिशवी उचलायला स्टेटस आडवे येते.आणि व्हाटसप चे स्टेटस मात्र स्वच्छता अभियानाचे असणार. सोशल मीडियावरची अस्वस्थता म्हणजे समुद्रात पडणारा पाऊस ..ना त्याचा शेतीला उपयोग ना तहान भागवणेसाठी...पाऊस पडला ना बस्स..
     कधी कधी वाटत की स्वातंत्र्य पूर्व काळात फेसबुक ,व्हाटसप असते तर महात्मा गांधींनी हॅशटॅग चलेजावं,हॅशटॅग असहकार अशा चळवळी चालवल्या असत्या का? व्हर्चुअल मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला असता काय? मग सर्व नेटकऱ्यांनी me too  म्हणून साथ दिली असती काय?
     एकुणात मेंदू बधिर होत जातोय म्हणून की काय ए आय ची सपोर्टिंग सिस्टीम माणसाला विकसित करावी लागतेय?????

-@ प्रशांत शेलटकर - 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...