आई....
आई कुठे गेली?
तीच अस्तिव आहेच..
माझ्या धमन्यातून वाहतेय ती
माझ्या पेशींपेशीत रमलीय ती
आई कुठे गेली?
माझ्या ओल्या पापण्यात
ओथंबून येते ती आणि म्हणते
मी आहे रे..नको काळजी करू
आई कुठे गेली?
माझ्या जीन्स मध्ये
ती ओत:प्रोत भरून राहिलीय
माझ्यातच भरून राहीलय
तीच अपार्थिव अस्तित्व...
आई कुठे गेलीय ?
देहाच्या मर्यादा उल्लंघून
ती आता सोबतच असते
आताही आहे ..
तिचा करूण स्निग्ध हात
माझ्या पाठीवर फिरतोय..
आई कुठे गेली?
आई कुठे जाते का?
तिची नाळ अजूनही
पोसतेय माझा पिंड
तिच्या कुशीत
पाय पोटाशी घेऊन
तिचे बाळ शांत निजले आहे
तिचे बाळ शांत निजले आहे
© प्रशांत
8600583846
No comments:
Post a Comment