इतिहासाची बाकी...
स्वातंत्र्य लढ्याचा अर्थ इतकाच की काही जण स्वराज्यासाठी लढत होते तर काही जण सुराज्यासाठी दोन्ही आघाड्या तितक्याच महत्वाच्या होत्या.फरक हाच होता की स्वराज्यलढा हा सत्तेला थेट आव्हान असल्याने स्वराज्यासाठी जे लढत होते त्यांच्यावर ब्रिटिशांचा रोष असणे साहजिक होते. आणि जे सुराज्यासाठी लढत होते त्यांच्यावर प्रस्थापित समाजाचा रोष असणे नैसर्गिक होते..
काहीही असो त्या काळात जे काही झालं त्याविषयी टोकाच्या भूमिका घेऊन मतप्रदर्शन करणे चूक आहे. आणि मत असणे हे सुद्धा ठाम असण्याची शक्यता नसते , इतिहासाची लिखित साधने पण कितपत विश्वासार्ह असतील तेही सांगता येत नाही, कधी पूर्वग्रह ठेवून तर कधी व्यक्तीगत अनुभवाच्या प्रभावाखाली येऊन लेखन झाल्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. तरी देखील लिखित साधने हे इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन असल्याने ते नाकारून चालत नाही.
मानवी इतिहासाचे ताणेबाणे एकमेकांत गुंतल्या मुळे.. कोणती तरी एक तळी उचलून बाजू घेण्यात अर्थ नसतो. कोणाला तरी नायक आणि कोणाला तरी खलनायक करून काढलेले निष्कर्ष फार तर मनोरंजक, आकर्षक असतील पण ते सत्याचे यथार्थ आकलन असणार नाही. दोन अधिक दोन बरोवर चार हे निष्कर्ष गणितात ठीक असतात. पण इतिहासातील कोणतेही घटना काढा त्याला अनेक संदर्भ आणि मानवी वृत्ती चिकटलेल्या असतात.त्यामुळे इतिहासाला कधीच पूर्ण भाग जात नाही बाकी ही उरतेच..
आपले मत बदलते ठेवण्यातच भलाई असते. अभ्यासाच्या प्रेमात पडावे, मतांच्या आणि लेखकाच्या नव्हे.
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment