Ad

Monday, 21 November 2022

प्रमुख पाहुणे

प्रमुख पाहुणे...

सभे मध्ये काही वेळा एखादा वक्ता प्रमुख पाहुण्यांची इतकी स्तुती करतो की अस वाटत की आता हा थोड्या वेळाने स्टेज वर गांडूळा सारखा वळवळायला लागेल..अतिथी किंवा प्रमुख पाहुणे यांचे कौतुक करणे अतिथी धर्माला साजेसे असतेच पण अति झाली की त्याची माती होते. आताच एक पेपरमधली बातमी वाचली.....सहकार कोळून प्यालेले नेते वगैरे वगैरे...जीवनात अस कोणतेही क्षेत्र नाही की जे कोणाला परिपुर्ण समजलं आहे. कोळून पिणे हा शब्दप्रयोग खाजगी  संवादाच्या वेळी ठीक असतो पण व्यासपीठावर बोलताना वक्त्याला भान असले पाहिजे. कौतुक करताना वास्तवाचे भान सोडू नये.
       काही वेळा इतकी अतिशयोक्ती होते की प्रमुख पाहुणे आणि श्रोते दोन्ही ओशाळून जातात, प्रमुख पाहुणे काय चीज आहे हे खूप वेळा श्रोत्यांना आणि खुद्द त्याना माहीत असते. प्रमुख पाहुणे कितीही भ्रष्टाचारी ,उर्मट,माजोरडे असले तरी एकदा का स्टेज वर आले की एकदम निस्पृह, स्वच्छ आणि अत्यंत विनयशील व्यक्तिमत्त्व बनून जातात. त्यांच्याकडून काही लाभ घ्यायचे असतील तर हमखास असे होतेच..विशेषतः राजकीय सभा अशाच असतात. अशा सभे मध्ये स्टेज वर पुष्पगुच्छाच्या  पलीकडे बसलेली व्यक्ती सहकार सम्राट,शिक्षणमहर्षी,लोकनेते, अजातशत्रू, लाडके व्यक्तीमत्व, भाई,दादा,  वगैरे वगैरे असतात..स्तुतीचे एखादें वाक्य टाकले की पाहुण्यांकडे प्रेमाने पाहण्याची पद्धत असते ,पाहुण्यांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा किती ताणली जातेय त्यावर पुढचे बरेच काही अवलंबून असते प्रमुख पाहुण्यांची अशी वारेमाप स्तुती झाली की समजून जायचं की आयोजकांचे काही ना काही स्वार्थ आहेत . 

     असो..अतिशयोक्ती असू नये.सभेचे सूत्रसंचालन करणारा हा स्तुती पाठक न वाटता सुत्रसंचालकच वाटला पाहिजे इतकेच...

-प्रशांत शेलटकर
 860058346

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...